सुएझ कालवा कोंडीचा फटका; इंधन, गॅस दरवाढीचा भडका उडणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 31, 2021

सुएझ कालवा कोंडीचा फटका; इंधन, गॅस दरवाढीचा भडका उडणार?

https://ift.tt/3u55Na3
सुएझ: आठवड्याभरापासून सुएझच्या कालव्या एव्हर गिव्हन जहाज अडकले होते. त्यामुळे सुएझ कालव्यातून होणारी जलवाहतूक ठप्प झाली होती. सुएझ कालव्यातील कोंडीचा फटका जागतिक व्यापारालाही बसला आहे. अनेक देशांमध्ये गॅस, इंधन दराचा भडका उडाला असून अनेकांना आर्थिक फटकाही सहन करावा लागला आहे. सुएझ कालव्यावरील मार्गावर परिणाम झाल्यामुळे पूर्व आणि पश्चिम दिशेतील बर्‍याच देशांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या घटनेमुळे भारतालाही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सुएझ कालवा जगातील सर्वात व्यस्त जलवाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे. जवळपास १२ टक्के जागतिक व्यापार याच मार्गातून होतो. जवळपास आठवडाभर हा मार्ग ठप्प होता. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर झाला आहे. वाचा: शिपिंग आणि जलवाहतुकीबाबत वृत्त देणाऱ्या 'लॉयड लिस्ट' या साप्ताहिकाने दिलेल्या वृत्तानुसार दररोज ९ अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत होते. जपानचे एक जहाज सुएझ कालव्यात अडकल्यामुळे जवळपास ५४ अब्ज डॉलर फटका त्यांना बसला. वाचा: जगातील अनेक देशांना कच्चे तेल आणि गॅसचे दर वाढल्यामुळे आर्थिक नुकसान झाले. 'एव्हर गिव्हन' जहाज हे अनेक दिवस सुएझ कालव्यात अडकून राहू शकते, या अंदाजामुळे अनेक देशांनी तेल आणि गॅसचे दर वाढवले. सुएझ कालव्यातील कोंडीमुळे सुएझ कालव्यातून मिळणाऱ्या महसुलावरही याचा परिणाम झाला. दररोज १४ ते १५ दशलक्ष डॉलरचा महसूल बुडाला असल्याची माहिती सुएझ कालवा प्राधिकरणाने दिली. वाचा: एव्हरग्रीन कंपनीचे 'एव्हरगिव्हन' हे महाकाय मालवाहू जहाज वादळात भरकटल्याने सुएझ कालव्यामध्ये अडकले होते. यामुळे दोन्ही दिशेची जलवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. युरोपात प्रवेश करण्यासाठी जहाजांना दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे या जहाजाची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते.