Coronavirus : देशात एका दिवसात जवळपास ४० हजार रुग्ण आढळले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

Coronavirus : देशात एका दिवसात जवळपास ४० हजार रुग्ण आढळले

https://ift.tt/3cRfS3c
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्या विभागाकडून शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोना संक्रमित ३९ हजार ७२६ नव्या रुग्णांची भर पडलीय. याच काळात २० हजार ६५४ रुग्णांनी करोनावर मात केलीय. तर १५४ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. सोबतच, भारतात आतापर्यंत आढळलेल्या करोना संक्रमित रुग्णांची संख्या १ कोटी १५ लाख १३ हजार ९८९ वर पोहचलीय. यातील १ कोटी १० लाख ८१ हजार ५२६ रुग्णांनी करोनावर मात केलीय. तर २ लाख ६८ हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एव्हाना १ लाख ५९ हजार ४०६ जणांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत. एकूण रुग्णसंख्या : १ कोटी १५ लाख १४ हजार ३३१ बरे झालेल्या रुग्णांची संख्या : १ कोटी १० लाख ८३ हजार ६७९ उपचार सुरू : २ लाख ७१ हजार २८२ एकूण मृत्यू : १ लाख ५९ हजार ३७० देशभरात आत्तापर्यंत एकूण ३ कोटी ९३ लाख ३९ हजार ८१७ जणांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येतेय. त्यापाठोपाठ सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या २३ लाख ९६ हजार ३४० वर पोहचलीय. यातील २१ लाख ७५ हजार ५६५ जणांनी करोनावर मात केलीय. तर १ लाख ६६ हजार ३५३ रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ५३ हजार १३४ रुग्णांनी आपला जीव गमावलाय.