फ्रान्समध्ये करोनाची तिसरी लाट; पॅरिससह अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

फ्रान्समध्ये करोनाची तिसरी लाट; पॅरिससह अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउन

https://ift.tt/3lvevLv
पॅरिस: जगभरात करोना संसर्गाचे थैमान सुरू असून अद्यापही त्याला अटकाव करता आले नसल्याची परिस्थिती आहे. करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून फ्रान्समध्ये तिसरी लाट आहे. फ्रान्समधील काही भागांमध्ये मर्यादित स्वरुपाच्या लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी केली आहे. फ्रान्समध्ये करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पॅरिससह देशभरातील १६ भागांमध्ये एक महिन्यांच्या लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान कॅस्टेक्स यांनी गुरुवारी केली. सीएनएनने दिलेल्या वृ्त्तानुसार, नवीन लॉकडाउन शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार असून चार आठवड्यांसाठी असणार आहे. मागील वर्षी मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात लागू झालेल्या लॉकडाउनपेक्षा या लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत. या लॉकडाउनमध्ये शाळा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू राहणार आहेत. वाचा: पंतप्रधानांनी सांगितले की, लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असली तरी मित्रांच्या घरी पार्टी करण्यासाठी परवानगी नसणार. सोशल डिस्टेसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करावाच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: नवीन निर्देशांनुसार, लोकांना घरातून काम करण्ययासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. घराबाहेर पडण्यासाठी आणि व्यायामशाळेत जाण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय कोणत्याही नागरिकाला आपल्या घरापासून १० किमीपेक्षा अधिक दूर जाता येणार नाही. शाळा, विद्यापीठ सुरूच राहणार असून अत्यावश्यक व्यवसाय सुरूच राहणार आहे. यामध्ये पु्स्तके आणि संगीताशी संबंधित असणाऱ्या दुकांनाची समावेश आहे. वाचा: पंतप्रधान कॅस्टेस्क यांनी सांगितले की, करोनाच्या संसर्गाने एका प्रकारच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश केला असून अनेक देशांना प्रभावित केले आहे. महासाथीच्या आजार ओव्हरटाइम करत असल्याचे त्यांनी म्हटले. फ्रान्समध्ये आतापर्यंत ४२ लाख ४१ हजार ९५९ जणांना करोनाची बाधा झाली असून ९१ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.