संतापजनक! अयोध्येत ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 5, 2021

संतापजनक! अयोध्येत ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक

https://ift.tt/3ueKCT0
अयोध्या: उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यातील रुदौली परिसरातील एका गावात चार वर्षांच्या मुलीवर झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील तरुणानेच हे घृणास्पद कृत्य केले. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चार वर्षांची मुलगी संध्याकाळी उशिरापर्यंत घरासमोर खेळत होती. घटना घडली त्यावेळी आम्ही शेतावर गेलो होतो. त्यावेळी गावातील तरुणाने मुलीला घेऊन गेला. गावाबाहेरील ओढ्याच्या दिशेने नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तत्पूर्वी, मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ माजली. कुटुंबीयांसह गावातील लोकही त्या मुलीचा शोध घेत होते. गावाजवळील ओढ्याजवळ मुलगी रडत बसली होती. तिची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही केली आहे, अशी माहिती रुदौली पोलीस ठाण्याचे प्रमुख राकेश श्रीवास्तव यांनी दिली.