माद्रिद: स्पेनमध्ये एका व्यक्तिला फैलावल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तिमुळे २२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यक्तिने खोकला आणि ताप असतानाही कामावर येत होता. त्याच्यासोबत काम करणाऱ्या २२ जणांना करोनाची लागण झाली. पोलिसांनी आरोपीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण मेजारका शहरातील आहे. या आरोपीच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने तोंडावरील मास्क काढत अनेकदा खोकला आहे. खोकल्यानंतर त्याने सगळ्यांना करोनाबाधित करायचे असल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर आरोपीसोबत काम करणारे पाच जण आणि जिममध्ये जाणाऱ्या अन्य तिघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना जानेवारी महिन्यातील आहे. वाचा: आरोपीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयासह १४ जणांनादेखील करोनाची बाधा झाली. यामध्ये तीन वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीमध्ये करोनाची लक्षणे आढळून येत होती. त्यानंतरही त्याने घरातून काम करणे टाळले आणि कार्यालयात जात होता. त्यामुळे करोनाचा संसर्ग फैलावला. वाचा: पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या दबावानंतर त्याने आरटीपीसीआर चाचणी केली. मात्र, चाचणीचा अहवाल येण्याची प्रतिक्षा न करता तो कार्यालयात आणि जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. त्याची तब्येत पाहता त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र, आरोपीने त्याला नकार दिला. त्यानंतर मास्क खाली करत मी तुम्हा सर्वांना करोनाबाधित करणार असल्याचे म्हटले. वाचा: आरटीपीसीआर चाचणीत त्याला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. चाचणी केल्यानंतर आरोपीच्या संपर्कात आलेल्या २२ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. बाधितांची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर आजारी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.