
नवी दिल्ली : आसामच्या गुवाहाटीसहीत भारताच्या पूर्व भागाला आज सकाळी झालेल्या भूकंपानं हादरवून टाकलं. सकाळी ७.५५ वाजल्याच्या सुमारास जाणवलेल्या या जोरदार धक्क्याच्यी तीव्रता ६.४ रिश्टर स्केल असल्याचं समजतंय. या आसामच्या भागात असल्याचं समजतंय. तर गुवाहाटीमध्ये ४.३ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा प्रभाव आणि उत्तर बंगालमध्येही जाणवला. दार्जिलिंगमध्येही लोक आपापल्या घरांतून बाहेर पडले. तसंच बिहारच्या अनेक जिल्ह्यांतही सकाळी ७.५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. मुंगेर, कटिहार, किशनगंज, भागलपूर, पूर्णिया, खगडिया यांसहीत अनेक भागांत लोकांना भूकंपाचा धक्का सहज जाणवला. भूकंपाच्या झटक्यानंतर आसामचे आरोग्य मंत्री यांनीही दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नुकसानीचा अंदाज येऊ शकतो. गुवाहाटीमध्ये भूकंपानंतर अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. काही मिनिटांपर्यंत हे भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवत होते. त्यामुळे भीतीनं हे नागिरक आपापल्या घरांतून बाहेर धावत सुटले. भूकंपाचा पहिला मोठा झटका बसल्यानंतर ४.३ आणि ४.४ रिश्टर स्केलचे दोन सौम्य स्वरुपाचे झटकेही या भागाला जाणवले.