सूनेवर होती सासऱ्याची वाईट नजर; मुलाने दिली हत्येची सुपारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 3, 2021

सूनेवर होती सासऱ्याची वाईट नजर; मुलाने दिली हत्येची सुपारी

https://ift.tt/3sLE0Lq
जबलपूर: आपल्या सूनेवर वाईट नजर असलेल्या सासऱ्याची करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये घडली. त्याच्या मुलानेच ५० हजारांची सुपारी देऊन त्याची हत्या घडवून आणली. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जबलपूरच्या बरगी पोलीस ठाण्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बरगी पोलिसांना २८ मार्च रोजी दुपारी गढ गोरखपूर बीटच्या जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तिथे पोहोचले. व्यक्तीची हत्या झाली असून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या हत्याकांडाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षकांनी वेगवेगळ्या पथकांची नेमणूक केली. सिवनी जिल्ह्यातील पोलिसांकडूनही या प्रकरणाबाबत माहिती घेतली जात होती. सिवनी जिल्ह्यातील घुंसोर येथील बरोदा येथील ५२ वर्षीय शैल पटेल बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. बरगी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना बोलावले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृताच्या पत्नीने सांगितले की, २६ तारखेला तिचे पती शैल पटेल यांना आयुष शर्मा उर्फ छोटू आणि मनोज उर्फ पंडा आपल्यासोबत दुचाकीवरून घेऊन गेले होते. त्यानंतर ते परतले नाहीत. पोलिसांनी आयुष आणि मनोजचा शोध घेतला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या हत्याकांडाचा उलगडा झाला. शैल पटेल यांची हत्या त्याच्या मुलानेच केली होती, त्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली. वडिलांची माझ्या पत्नीवर वाइट नजर होती. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे आरोपीने सांगितले. हत्येसाठी गावातीलच प्रमोद पटेल याला ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती, असेही त्याने सांगितले.