पालिकेच्या कर विभागाला आग; सर्व रेकॉर्ड जळून खाक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

पालिकेच्या कर विभागाला आग; सर्व रेकॉर्ड जळून खाक

https://ift.tt/3e1yz62
म. टा. प्रतिनिधी, जालना: जालना नगरपालिकेतील कर विभागाला बुधवारी रात्री उशिरा आग लागून सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले. एवढी मोठी आग लागून ती विझवण्याचा कुठलाही प्रयत्न करण्यात आला नसल्याची, माहिती समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकेत रात्री ड्यूटीवर असलेल्या तीन सुरक्षारक्षकांभोवती संशयाची सुई फिरत आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी, की जालना नगरपालिका इमारतीच्या दहा नंबरच्या दालनात कर विभाग आहे. याठिकाणी बुधवारी रात्री आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. आग एवढी मोठी होती की काही वेळातच कर विभागातील रेकॉर्डरूमधील जवळपास सर्वच रेकॉर्ड जळून खाक झाले. अग्निशमन विभागाचे बंब पोचण्यापूर्वी विभागाचे कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. वाचाः दरम्यान, नगर पालिकेत रात्री ड्यूटीवर असलेले तीनही वॉचमन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालय सील करण्याचे आदेश दिले असून प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही आणि अग्निशामक यंत्रणा कार्यन्वित असून सकाळी नुकसानीची पाहणी करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नार्वेकर यांनी दिली. वाचाः