करोनाच्या संकटावर मात करू; फ्रान्सच्या राष्ट्रपतींची हिंदीतून पोस्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 28, 2021

करोनाच्या संकटावर मात करू; फ्रान्सच्या राष्ट्रपतींची हिंदीतून पोस्ट

https://ift.tt/3xxkFAD
पॅरिस: करोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या भारताला जगभरातून मदतीचा हात दिला जात आहे. अनेक देशांनी भारतासोबत भ्रातृभाव व्यक्त करत मदत पोहचवण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी करोनाने निर्माण केलेल्या खडतर आव्हानांवर मात करू असे म्हटले आहे. मॅक्रॉन यांनी हिंदीतून ही पोस्ट लिहीली असून फ्रान्स भारतासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मॅक्रॉन यांनी म्हटले की, या महासाथीतून कोणीही सुटले नाही. भारत सध्या एका कठीण काळातून जात असल्याची आम्हाला जाणीव आहे. फ्रान्स आणि भारत नेहमीच एकत्र राहिले आहेत. आमच्याकडून सहकार्य देण्यासाठी तत्परतेने कार्य सुरू केले असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले. वाचा: फ्रान्सकडून भारताला देण्यात येणाऱ्या मदतीवर सर्व संबंधित मंत्रालयाचे लक्ष आहे. त्याशिवाय फ्रान्समधील कंपन्या मदतीसाठी सरसावल्या असून त्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये मैत्री असून आपण एकत्रपणे विजय मिळवू असा विश्वासही फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केला. फ्रान्सनेही भारताच्या मदतीसाठी एकजुटता अभियान सुरू केले आहे. या अभियानातंर्गत भारताला वैद्यकीय उपकरणे, सामग्री मिळणार आहे. करोनाशी झुंजणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या परराष्ट्र खात्याने म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सहकार्य केंद्र आणि भारतीय दूतावासाद्वारे हे अभियान चालवण्यात येणार आहे. त्यानुसार, या आठवड्याच्या अखेरीस हवाई आणि समुद्री मार्गाने वैद्यकीय उपकरणे, सामग्री पाठवण्यात येणार आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत एमॅन्यूअल लेनिन यांनी सांगितले की, भारत आणि युरोपीयन महासंघातील फ्रान्सच्या कंपन्यांच्या मदतीने हे मोठे अभियान राबवले जाणार आहे. वाचा: फ्रान्सकडून भारताला आठ ऑक्सिजन जनरेटर मिळणार आहेत. त्याद्वारे प्रति जनरेटरमधून पुढील किमान १० वर्षांसाठी २५० खाटा असलेल्या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करता येण्याची क्षमता आहे. पहिल्या खेपमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे पाच कंटेनर पाठवण्यात येत आहे. त्याद्वारे एका दिवसात किमान १० हजार रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येऊ शकतो. त्याशिवाय २८ व्हेंटिलेटरही पाठवण्यात येणार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ही वैद्यकीय उपकरणे, सामग्री पाठवण्यात येत असल्याचे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.