इंजिनिअर तरुणीसह दोघांची आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 3, 2021

इंजिनिअर तरुणीसह दोघांची आत्महत्या

https://ift.tt/3fKyHIm
म.टा. प्रतिनिधी, इंजिनीअर तरुणीसह दोघांनी शहरात आत्महत्या केल्याचे पुढे आले. रागिनी जिंबल वासनिक (वय २१, रा. पवनशक्तीनगर) असे इंजिनीअर तरुणीचे नाव आहे. तिने घरी गळफास घेतला. तिचे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते. एका खासगी कंपनीत तिला नोकरीसुद्धा मिळाली होती. ती वर्क फ्रॉम होम करीत होती, असे कळते. मात्र, तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्तास पोलिसांनी याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय वनसर्वेक्षण विभागात कार्यरत असलेल्या एकाने गळफास लावून आत्महत्या केली. सतीश हरिभाऊ बोरेकर (वय ४८, रा. न्यू सुभेदार ले आउट) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते मनोरुग्ण होते व त्यांच्यावर मानसोपचारही सुरू होते. त्यांच्या घरून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट प्राप्त झाली नाही. तूर्तास हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.