
वॉशिंग्टन: भारतात करोना महासाथीच्या आजाराचे संकट गडद होत चालले आहे. भारतात सुरू असलेल्या करोनाच्या थैमानामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे भारताकडे लक्ष आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित 'टाइम' पाक्षिकाने आपल्या मुखपृष्ठावर भारतातील करोना संकटाच्या भीषणतेवर भाष्य करणारे छायाचित्र प्रकाशित केले आहे. 'भारत संकटात' या मथळ्याखाली स्मशान भूमीतील छायाचित्र टाइमने प्रकाशित केले. भारतातील करोना परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भाष्य केले आहे. भारतात करोनाचे संकट अधिक गंभीर होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आपल्या वृत्तांकनात दिला होता. 'टाइम'साठी नैना बजेकल यांनी कव्हर स्टोरीत म्हटले की, भारतातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या परिस्थितीत आहे. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णांसाठीच्या खाटांची कमतरता आहे. भारतीय रेमडेसिवीरच्या शोधासाठी धावपळ करत आहेत. मागणी अधिक असल्यामुळे औषधे चढ्या दराने खरेदी करावे लागत आहेत. तर, वाढत्या करोना चाचणींमुळे प्रयोगशाळांवर ताण वाढला आहे. हे करोना संकट फक्त भारतातील १.४ अब्ज नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी भयावह असणार असल्याचे 'टाइम'ने म्हटले. वाचा: वाचा: वाचा: भारतातील करोना संकटाची परिस्थिती पाहता जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारतीय हवाई दलाने गुरुवारी बँकॉक, सिंगापूर आणि दुबईतून १२ रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर भारतात आणले. थायलंड व सिंगापूरमधून प्रत्येकी तीन आणि दुबईतून सहा कंटेनर हवाई दलाने भारतात आणले आहेत. हे कंटनेर देशातील विविध शहरातील ऑक्सिजन फिलिंग स्टेशनवर पोहचवण्यात येतील. जेणेकरून रुग्णालयांना, करोनाबाधितांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करता येऊ शकतो. त्याशिवाय, अमेरिका, ब्रिटन आदी देशांमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेर्सही भारतात दाखल झाले आहेत.