नवी दिल्ली : देशात, रविवारी (२६ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ५४ हजार ६५३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ८०८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात रविवारी एकूण २ लाख १८ हजार ६२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९५ हजार ११८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. देशात आत्तापर्यंत १ कोटी ४२ लाख ९६ हजार ७०३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२०
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ४२ लाख ९६ हजार ७०३
- उपचार सुरू : २८ लाख ०७ हजार ३८८
- एकूण मृत्यू : १ लाख ९५ हजार ११८
- करोना लसीचे डोस दिले गेले : १४ कोटी ०९ लाख १६ हजार ४१७