संतापजनक! ३ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 26, 2021

संतापजनक! ३ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

https://ift.tt/3njZEEG
म. टा. विशेष प्रतिनिधी, चॉकलेटचे आमिष दाखवून अवघ्या तीन वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झालेला सत्पालसिंग जोगेंदरसिंग कोतडा (३५) याचे अपिल मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नुकतेच फेटाळून लावले. पीडित मुलाच्या वडिलांनी सत्पालविरोधात २८ मार्च २०१३ रोजी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३७७ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६ व १० अन्वये एफआयआर नोंदवला होता. तक्रारदार हे पत्नी व तीन मुलांसोबत राहतात. २७ मार्च २०१३च्या रात्री मुलाचे वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी त्याला व मोठ्या मुलीला (८)चॉकलेटसाठी पैसे दिले. त्यानंतर दोघे घराबाहेर पडले. मात्र, येताना मुलगी एकटीच घरी परतली. म्हणून वडिलांनी चौकशी केली असता, मुलगा शेजारच्या काकांच्या घरी गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर वडील शेजारी गेले असता मुलगा रडत असल्याचे आणि त्याच्या अंगावर कपडे नसल्याचे त्यांनी पाहिले. त्याने गुदद्वारात दुखत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास त्रास झाल्याने मुलगा खूप रडू लागला. तेव्हा, वडिलांनी पुन्हा विचारले असता, मुलाने त्याच्या भाषेत शेजारच्या काकांनी केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतरच सत्पालने केलेला गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी खटल्याच्या सुनावणीअंती सत्र न्यायालयाने २०१८मध्ये सत्पालला दहा वर्षांची सक्तमजुरी व २५ हजार रुपयांच्या दंडाची तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्याने अपिल केले होते.