इरफान खान यांना जिंकायचा होता ऑस्कर, ठरवली होती ट्रॉफी ठेवायची जागा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 27, 2021

इरफान खान यांना जिंकायचा होता ऑस्कर, ठरवली होती ट्रॉफी ठेवायची जागा

https://ift.tt/3gG5DlW
मुंबई- बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते आज आपल्यात नाहीत. परंतु, त्यांच्या चित्रपटांमधून ते नेहमी चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील. आज ९३ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. एवढ्या मोठ्या सोहळ्यात इरफान यांना दिल्या गेलेल्या श्रद्धांजलीमुळे अनेकांचे डोळे भरून आले. अभिनयात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हतं. इरफान बॉलिवूड इतकेच हॉलिवूडमधेही लोकप्रिय होते. त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं होतं. परंतु, इरफान यांची ऑस्कर जिंकण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. ऑस्कर पुरस्कार मिळणं ही सन्मानाची गोष्ट मानली जाते. इरफान यांना ऑस्कर जिंकण्याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी तर ऑस्कर जिंकल्यावर ट्रॉफी घरात कुठे ठेवली जाईल याचाही विचार केला होता. २०१७ साली इरफान यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला होता. या मुलाखतीच्या वेळेस ते त्यांच्या मुंबईतील आलिशान घरात बसले होते. त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की, 'जर ते ऑस्कर पुरस्कार जिंकले तर ते ट्रॉफी कुठे ठेवतील?' या प्रश्नावर उत्तर देताना इरफान यांनी म्हटलं, 'जर मला कधी हा सन्मान मिळाला तर मी ती ट्रॉफी माझ्या घरातल्या सगळ्यात निराळ्या जागेवर ठेवेन. तिला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं जाईल.' त्यासोबतच थोडीशी थट्टा करत त्यांनी म्हटलं, 'हा वेगळं ठेवेन म्हणजे काही बाथरूममध्ये ठेवणार नाही.' इरफान यांच्या 'स्लमडॉग मिलेनियर' आणि 'लाईफ ऑफ पाय' या हॉलिवूड चित्रपटांना ऑस्करमध्ये अनेक विभागांमध्ये नामांकनं मिळाली होती. इतकंच नाही तर त्यांना ऑस्करने सन्मानितदेखील केलं गेलं होतं. इरफान यांचा 'सलाम बॉम्बे' ला देखील ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. त्यांचा शेवटचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' होता. आता इरफान यांचा मुलगा बाबिलदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.