'माझा होशील ना' मालिकेत खलनायकाची ‘ एंट्री; 'हा' अभिनेता साकारणार खलनायक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 4, 2021

'माझा होशील ना' मालिकेत खलनायकाची ‘ एंट्री; 'हा' अभिनेता साकारणार खलनायक

https://ift.tt/3mgKzTK
मुंबई ः 'माझा होशील ना' ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या अॅवॉर्डमध्ये या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार मिळवत सर्वोत्कृष्ट मालिकेचा मानही मिळवला आहे. आता ही मालिकेत लवकरच एक मनोरंजक वळण येणार असून त्यात पुन्हा एका खलनायकाची एंट्री होणार आहे. या खलनायकाचा डाव आदित्य सई आणि त्याच्या पाच मामांच्या मदतीने उधळून लावतो की त्या खलनायकाच्या जाळ्यात तो अडकतो हे बघणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. 'माझा होशील ना' ही मालिकेमध्ये आधी सुयश हा खलनायक होता. आदित्य आणि सईचे लग्न होऊ नये म्हणून त्याने आणि त्याच्या घरच्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु विजय ख-या प्रेमाचा होत असल्याने, सई आणि आदित्य यांचे लग्न झाले. अर्थात हे लग्न होण्यासाठी आदित्यच्या मामांची त्याला साथ मिळाली होती. आता आदित्य सई यांचा नवा संसार सुरू झालेला आहे. नव्याची नवलाई ते आणि त्यांच्या बरोबरीने समस्त ब्रह्मे कुटुंब अनुभवत आहेत. परंतु आता या मालिकेत पुन्हा एकदा खलनायक येणार आहे. हा खलनायक म्हणजे जे. डीतं. कोण आहे हा जे. डी.? हा जे. डी. म्हणजे जयवंत देसाई. म्हणजे आदित्यचा काका. यानेच आदित्यच्या आई-वडिलांचा खून केलेला असतो. आता हाच जे.डी. अनेक वर्षांनी मुंबईत परतणार आहे. आदित्य ग्रुपची मालकी मिळवणे आणि ज्या ब्रह्मे भावंडांमुळे हातातोंडाशी आलेली संपत्ती आणि कंपनीची मालकी गेली त्या भावांना देशोधडीला लावणे हे त्याचे उद्दिष्ट्य असणार आहे.अत्यंत कपटी, बेरकी आणि क्रूर असा हा जेडी आदित्य-सईच्या आयुष्यात संकट बनून येणार आहे.मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातला ख्यातनाम कलाकार पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. या जेडीच्या आगमनाने आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होणार असून, ब्रह्मे कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. आता या मालिकेत अनेक वेगवान घडामोडी घडणार आहेत. आता आदित्यचे मामा आणि सई-आदित्य या नव्या आव्हानाला संकटाला कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.