इस्रायलमध्ये मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत ३८ ठार, शेकडो जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 30, 2021

इस्रायलमध्ये मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत ३८ ठार, शेकडो जखमी

https://ift.tt/2R9ExZJ
तेल अवीव: करोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बोनफायर फेस्टिवल दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. फेस्टिवल दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहा हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. करोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतरच्या वर्षानंतर माउंट मेरोनवर झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम होता. करोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिकजणांनी या बोनफायर फेस्टिवलसाठी हजेरी लावली होती. वाचा: ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा ज्यू धर्मियांसाठी जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. हे एक वार्षिक तीर्थस्थळ आहे. हजारोजणांनी या वार्षिक उत्सवासाठी हजेरी लावली होती. दुसऱ्या शतकातील संत संत रब्बी शिमोन बार योचाई यांचे या ठिकाणी समाधीस्थळ आहे. बोनफायर फेस्टिवलमध्ये रात्रभर प्रार्थना आणि नृत्य सादर केले जात होते. माउंट मेरेन स्टेडिअममध्ये आसन व्यवस्था कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. वाचा: या दुर्घटनेत ३८ जण ठार झाले असून मृतांची संख्या अधिक असणाऱ्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती समजताच इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनीदेखील घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. तर, दुसरीकडे मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले. या उत्सवासाठी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या भागात प्रवेश बंदी लागू केली.