Oscars 2021- जेव्हा रहमान यांनी हरवला होता ऑस्कर, म्हणाले .. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 26, 2021

Oscars 2021- जेव्हा रहमान यांनी हरवला होता ऑस्कर, म्हणाले ..

https://ift.tt/2QpO9zI
मुंबई: ऑस्कर २०२१ चा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा कोविड १९ मुळे हा पुरस्कार सोहळा थोड्या वेगळ्या पद्धतीनं पार पडला पण त्यानिमित्तानं भारतीयांच्या ऑस्करच्या आठवणी जाग्या झाल्या. २००९ मध्ये दोन अकादमी पुरस्कार जिंकत संगीतकार यांनी इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय होते. 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी ए.आर. रहमान यांना हे पुरस्कार मिळाले होते. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ए.आर. रहमान यांनी सांगितलं की, एकदा त्यांनी स्वतःचा ऑस्कर पुरस्कार हरवला होता. तामिळ मासिकला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी त्यांच्या या ऑस्कर पुरस्काराचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'माझ्या आईनं एका कपड्यात गुंडाळून ते पुरस्कार कपाटात ठेवला होता. मला जेव्हा ऑस्कर मिळाला होता. तेव्हा तिला वाटयचं की तो सोन्याचा वापर करून तयार केलेला आहे. त्यामुळे तिने तो एका कपड्यात गुंडाळून कपाटात सुरक्षित ठेवला होता. ऑस्कर जिंकल्यानंतर अनेक वर्ष मी त्याचा विचारसुद्धा केला नव्हता. पण जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा मी त्या घरी गेलो होतो तेव्हा मला माझ्या पुरस्काराची आठवण आली म्हणून मी त्या कपाटात पाहिलं पण मला तो मिळाला नाही. मला वाटलं तो कुठूतरी हरवला. त्यानंतर मी तो संपूर्ण घरात शोधला तेव्हा तो मला दुसऱ्या कपाटात सापडला.' रहमान यांच्या आईचं निधन डिसेंबर २०२०मध्ये झालं होतं. सध्या ए.आर. रहमान 'हिंदी'मुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच '९९ सॉन्ग'च्या प्रमोशनमध्ये ए.आर. रहमान यांनी एका अँकरला हिंदी बोलत असताना थांबवलं होतं. गाण्याच्या प्रमोशनाच्या वेळी अँकरनं ए.आर. रहमान आणि अभिनेता एहान भट्ट यांचं हिंदी आणि तमिळमध्ये स्वागत केलं. त्यावर ए.आर. रहमान तिच्या हिंदी बोलण्यावर आक्षेप घेत स्टेजवरून खाली उतरले होतं. अर्थात हा एक गंमतीचा भाग होता हे रहमान यांनी नंतर स्पष्ट देखील केलं होतं. दरम्यान हिंदी बोलताना ऐकल्यानंतर स्टेजवरून खाली उतरणाऱ्या रहमान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. ज्यानंतर स्टेजवरून खाली उतरणं हा केवळ गंमतीचा भाग होता हे असं स्पष्टीकरण दिलं होतं. अँकरन एहानला खूश करण्यासाठी हिंदी बोलली होती कारण त्याला तमिळ पेक्षा हिंदी अधिक चांगली समजते. लोकांनी काहीच जाणून न घेता याची चर्चा केली. मी फक्त गंमत केली होती. ज्याला गांभीर्यानं घ्यायची गरज नव्हती.