मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अनेकदा बॉलिवूडच्या कलाकारांवर निशाणा साधणाऱ्या कंगनाचं म्हणणं आहे. बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींनी एकत्र येत तिच्या विरोधात कट कारस्थान केलं आहे आणि त्या एक ग्रुप करून तिला पाठिंबा देत नाहीत. काही दिवसांपासून कंगनाचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये कंगना अनेक बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींचं तोंडभर कौतुक करताना दिसत आहे ज्यांच्यावर मागच्या काही काळापासून ती टीका करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना, , प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि या सर्वच अभिनेत्रींचं कौतुक करताना दिसत आहे. गॅलॅक्सी नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून कंगनाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कंगनानं हा व्हिडीओ रिट्वीट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी एकही अभिनेत्री नाही. ज्या अभिनेत्रीनं मला पाठिंबा दिला आहे किंवा माझं कौतुक केलं आहे आणि हा याचा पुरावा आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की त्यांनी असं का केलं? त्यांनी माझ्या विरोधात ग्रुप का तयार केला असेल? जरा विचार करा.' कंगनानं तिच्या पुढच्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मी कशाप्रकारे यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरला जात असे, जेव्हा या सर्वजणी मला कॉल करून किंवा मेसेज करून बोलवत असत. याच अभिनेत्री मला पुष्पगुच्छ पाठवत असत. माझी काळजी घेत असत. पण जेव्हा मी माझ्या चित्रपटांच्या प्रीमियरला यांना बोलवलं तेव्हा त्यांनी माझा कॉल सुद्धा उचलला नाही. आता मी रोज यांचा अपमान करते. कारण या सर्वजणी याच्याच लायक आहे.' कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा आगामी चित्रपट 'थलायवी' येत्या २३ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये कंगनानं जयललिता यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय कंगना अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत 'धाकड'मध्येही दिसणार आहे. तसेच सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'तेजस'च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या चित्रपटात ती भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.