परमबीर सिंग यांची अडचण वाढली; सिंग, शर्मांविरोधात तक्रार दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 22, 2021

परमबीर सिंग यांची अडचण वाढली; सिंग, शर्मांविरोधात तक्रार दाखल

https://ift.tt/3oEkhMm
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त () यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे () नवी तक्रार दाखल झाली आहे. विरारचे बिल्डर मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग, आणि पोलिस निरीक्षक राजकुमार कोठमायर यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राऊत यांनी संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पोलिस अधिकाऱ्यांवर अपसंपदेचा गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासाला सुरुवात केली असून मयुरेश यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना सोमवारी २४ मे रोजी ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंग यांना २४ मेपर्यंत अटक करू नये: हायकोर्ट दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर सोमवार, २४ मे पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. काल मध्यरात्री १२ पर्यंतही सुनावणी पूर्ण होत नव्हती. हे पाहून खंडपीठाने अखेरीस पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत परमबीर यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचे परमबीर सिंग यांचे म्हणणे आहे. मला लक्ष्य करण्यासाठी पूर्वी पाच एफआयआर नोंद असलेल्या भीमराज घाडगे या पोलीस अधिकाऱ्याच्याच खोट्या एफआयआरचा आधार घेण्यात आल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. हा संपूर्ण प्रकार अत्यंत कुहेतुने सुरू असल्याचा युक्तिवादही परमबीर सिंग यांच्यातर्फे करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-