
मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय असलेले खासदार संभाजीराजे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर समंजस भूमिका घेतली असली तरी सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजपचे आमदार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. (BJP Targets CM ) न्यायालयाच्या निकालानंतर भाजपच्या तमाम नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेचा भडिमार केला होता. सरकारच्या नाकर्तेपणामुळंच न्यायालयाचा निकाल आरक्षणाच्या विरोधात गेला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी केली होती. निकालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी निवेदन केले व बुधवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला होता. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा आहे. तशी दिशा, मार्गदर्शन सुप्रीम कोर्टानं केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं आता निर्णय घ्यावा, असं विनंतीवजा आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवरही भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. जनतेशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? वाचा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 'यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला...,' असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 'प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून,' असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. वाचा: