तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम के स्टॅलिन यांनी घेतली शपथ! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 7, 2021

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम के स्टॅलिन यांनी घेतली शपथ!

https://ift.tt/3urFECF
चेन्नई : द्रमुक मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख यांनी आज राज्याचे म्हणून शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना शपथ दिली. सकाळी ९.०० वाजता राजभवन परिसरात शपथविधीचा छोटेखानी कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्टॅलिन यांच्यासोबत इतर ३३ मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी बुधवारी स्टॅलिन यांना राज्यात सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. विधिमंडळपक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपालांनी स्टॅलिन यांना हे आमंत्रण धाडलं. उल्लेखनीय म्हणजे डीएमकेच्या गेल्या वेळच्या सरकारमध्ये (२००६ ते २०११) स्टॅलिन यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी हाताळली होती. त्याचे पिता एम करुणानिधी या सरकारचे मुख्यमंत्री होते. पहिल्यांदाच स्टॅलिन यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमनं २३४ पैंकी १३४ जागांवर विजय मिळवलाय. डीएमके आणि सहकाऱ्यांनी एकूण १५६ जागा खिशात घातल्यात. त्यामुळे त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.