ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवीने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 4, 2021

ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवीने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण

https://ift.tt/3thr53h
मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच मालदीवहून परतली आहे. ती तिथे फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी गेली नव्हती तर एका ट्रॅव्हल मॅगझीनसाठी फोटोशूट करायलादेखील गेली होती. यापूर्वी मालदीवचे काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि त्यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु, या वेळेस असं काही घडू नये याची खबरदारी जान्हवीने आधीच घेतली. जान्हवीने ट्रॅव्हल मॅगझीनवरचा फोटो शेअर करत त्यासोबत स्पष्टीकरण देखील दिलं. परंतु, एवढं करूनही जान्हवी ट्रोल झाली आहे. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रॅव्हल मॅगझीनवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी बिकनी परिधान करून मालदीवच्या निळ्याशार पाण्यात उभी राहिलेली दिसते. तिच्या पाठीमागे मालदीवच्या समुद्राचा सुंदर नजारा दिसत आहे. जान्हवीचा हा फोटो चाहत्यांना पसंत पडला आहे. या फोटोमुळे आपण ट्रोल होऊ नये म्हणून जान्हवीने त्यासोबत कॅप्शन दिलं, 'हे शूट आधीच ठरलेलं होतं आणि हे फोटो लॉकडाउनपूर्वीच काढले गेले आहेत. आम्ही सुरक्षित होतो आणि सगळी काळजी घेत होतो.' त्यासोबत जान्हवीने लिहिलं, 'मी आशा करते की तुम्ही सगळे सुरक्षित आहात आणि स्वतःची काळजी घेताय. हिमतीने परिस्थितीला तोंड देताय.' ट्रोल न होण्यासाठी कॅप्शन दिलेलं असूनही ऐकतील ते युझर्स कसले. जान्हवीच्या या कॅप्शनवर काही नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे. एका युझरने म्हटलं, 'तुझ्यासाठी काय गरजेचं आहे? तुझं काम की तुझा देश?' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'तू देशासाठी काय केलंय, जेव्हा आता देशाला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे.' आणखी एका युझरने लिहिलं, 'हा फोटो पोस्ट करताना तुला स्पष्टीकरण देण्याची गरज का पडली?'