कोविडसंबंधी चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली उच्च स्तरीय बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 15, 2021

कोविडसंबंधी चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली उच्च स्तरीय बैठक

https://ift.tt/3fcVcUs
नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणानं घातलेल्या थैमानादरम्यान यांनी शनिवारी एक बोलावलीय. या बैठकीत करोना संकटावर तसंच लसीकरणावर भर देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आज (शनिवारी) सकाळी ११.०० वाजता या बैठकीला सुरुवात होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, खुद्द पंतप्रधान मोदी या उच्च स्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच नीती आयोगाशी निगडीत उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत. सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचीही पंतप्रधानांना अपडेट माहिती देण्यात येईल. याशिवाय लसीकरण मोहिमेची गती वाढवण्याच्या विविध मार्गांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी ३ लाख २६ हजार ०९८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ वर पोहचलीय. कालच्या याच २४ तासांत कालच्या एका दिवसात ३८९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत देशात एकूण २ लाख ६६ हजार २०७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 'तौत्के' चक्रीवादळावरही बैठक याशिवाय शनिवारी सायंकाळी ५.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 'तौत्के' या चक्रीवादळासंबंधीही एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.