
वॉशिंग्टन: भारतात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याची परिस्थिती आहे. मात्र, वेळीच कठोर पावले न उचलल्यास भारतात एक ऑगस्टपर्यंत १० लाखांहून अधिकजणांचा करोनामुळे मृत्यू होण्याचा इशारा देण्यात आला आहे.अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशनने (आयएचएमई) हा इशारा दिला आहे. आयएचएमईने म्हटले की, आरोग्य व्यवस्थेला आणखी मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलवावे लागतील. त्याशिवाय सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न केल्यामुळे भारतातील परिस्थिती आणखी चिघळू शकते. येत्या तीन महिन्यात, एक ऑगस्टपर्यंत भारतात करोना बळींची संख्या १० लाखापर्यंत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यास ही संख्या १२ लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा अंदाज २५ ते ३० एप्रिलपर्यंतच्या माहिती आधारे व्यक्त करण्यात आला आहे. मागील आठवड्यात करोनाबाधितांच्या मृत्यू दरात ७८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. भारतातील करोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षाा सल्लागार जॅक सॅलिव्हियन यांनी म्हटले. वाचा: वाचा: २० मे पर्यंत करोनाचा जोर आयएचएमईच्या अंदाजानुसार, भारतात २० मेपर्यंत करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या अधिक असू शकते. एकाच दिवसात १२ हजार जणांच्या मृत्यूची नोंद होऊ शकते. आयएचएमईने याआधी १६ मेपर्यंत करोना मृत्यूचा जोर असल्याचे म्हटले होते. वाचा: अंदाज कशाच्या आधारे? आयएचएमईने सांगितले की, हा अंदाज व्यक्त करताना यामध्ये काही घटकांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे होणारे पालन आदी मुद्दे लक्षात घेऊन अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयएचएमई ही वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य संशोधन केंद्र आहे.