काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांचे निधन, पुण्यातील रुग्णालयात सुरू होते उपचार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 16, 2021

काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांचे निधन, पुण्यातील रुग्णालयात सुरू होते उपचार

https://ift.tt/3oo2ZDo
पुणे: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजकन बनली होती. अखेर आज त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (congress leader mp ) काँग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली. राजीव सातव यांनी माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये काम सुरू केले होते, असा एक साथीदार आज गमावला. राजीव सातव यांचा साधेपणा, हसरेपणा, त्यांची जमिनीशी जुळलेली नाळ, नेतृत्व आणि पक्षावर असलेली त्यांची निष्ठा आणि मैत्री आपल्याला नेहमीच लक्षात राहील. अशा शब्दात सुरजेवाला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाने गाठल्यानंतर उपचारानंतर ते बरे झाले होते. मात्र त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला होता. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते गेल्या २३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली.