गाझा: इस्रायलकडून गाझामध्ये हवाई हल्ले सुरूच आहेत. शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात आंतरराष्ट्रीय माध्यमांची कार्यालये असणाऱ्या १३ मजली इमारतीला उद्धवस्त करण्यात आले. या इमारतींमध्ये कतारच्या 'अल जझीरा' आणि अमेरिकन वृत्तसंस्था द असोसिएटेड प्रेसची कार्यालये होती. एएफपीने हे वृत्त दिले आहे. अल जझीराने ट्विट करून म्हटले की, इस्रायलने हवाई हल्ल्यात जाला टॉवर नष्ट केले. या इमारतीमध्ये अल जझीरासह आणि एका आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचे कार्यालय होते. या हल्ल्या आधी इस्रालयी सैन्याने इमारतीच्या मालकाला इशाला दिला होता. वाचा: माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एक बहुमजली इमारत कोसळली. हा हल्ला शहरात झाला. या इमारतीत अल जझीरा, द असोसिएटेड प्रेससारख्या माध्यमांच्या कार्यालयासह इतर कार्यालयेदेखील आणि निवासी अपार्टमेंटदेखील होती. इमारत रिकामी करण्याची सूचना दिल्यानंतर एक तासात हल्ला करण्यात आला. वाचा: परदेशी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या इमारतीवर हल्ला करण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून इस्रायलकडून बहुमजली इमारतींवर हल्ला करण्यात येत आहे. गाझीमधील बहुमजली इमारतींमधून हमास आपली सूत्रे सांभाळत असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात येत आहे. सोमवारपासून इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक ठार झाले आहेत.