आसाममध्ये वीज कोसळून १८ हत्तींचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 14, 2021

आसाममध्ये वीज कोसळून १८ हत्तींचा मृत्यू

https://ift.tt/3hpYiY7
नवी दिल्ली : आसामच्या नौगावमध्ये १८ हत्ती मृत अवस्थेत आढळलेत. वीज कोसळल्यानं या हत्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन वेगवेगळ्या भागांत अनेक सापडलेत. यातील एका जागेवर चार तर दुसऱ्या जागेवर १४ हत्ती मृतावस्थेत आढळले. एवढ्या मोठ्या संख्येत एकाच वेळी हत्तींचा मृत्यू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना असावी. आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीही या घटनेची नोंद घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. मृत हत्तींचा शवविच्छेदन अहवालात हत्तींच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल. कठियाटोली रेंजच्या वनक्षेत्रात डोंगराळ भागात बुधवारी रात्री वीज कोसळल्याची माहिती मुख्य वन संरक्षक अमित सहाय यांनी दिलीय. वन विभागाची टीम गुरुवारी दुपारी या भागात पोहचू शकली. दोन वेगळ्या कळपांमध्ये हत्तींचे मृतदेह सापडले. त्यापैंकी १४ हत्तींचे मृतदेह टेकडीच्या माथ्यावर तर चार मृतदेह टेकडीच्या खालच्या भागात सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.