देशभरात एका दिवसात २.५७ लाख करोनाबाधित; तर ४,१९४ जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 22, 2021

देशभरात एका दिवसात २.५७ लाख करोनाबाधित; तर ४,१९४ जणांचा मृत्यू

https://ift.tt/2Sky52s
नवी दिल्ली : भारतात सुरु असलेल्या कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेदरम्यान लसीची कमतरता हा चिंतेचा विषय ठरतोय. याच दरम्यान, शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२१ मे २०२१) २ लाख ५७ हजार २९९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९० वर पोहचलीय. देशात सध्या २९ लाख २३ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका दिवसात ४१९४ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण २ लाख ९५ हजार ५२५ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५७ हजार ६३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आत्तापर्यंत २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९०
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५
  • उपचार सुरू : २९ लाख २३ हजार ४००
  • एकूण मृत्यू : २ लाख ९५ हजार ५२५
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख ५८ हजार ८९५ लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३२ कोटी ६४ लाख ८४ हजार १५५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील २० लाख ६६ हजार २८५ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात शुक्रवारी करण्यात आली. प्रत्येक दिवशी दाखल होणारी रुग्णसंख्या ४ मे : ३,५७,२२९ ५ मे : ३,८२,३१५ ६ मे : ४,१२,२६२ ७ मे : ४,१४,११८ ८ मे : ४,०१,०७८ ९ मे : ४,०३,७३८ १० मे : ३,६६,१६१ ११ मे : ३,४८,४२१ १२ मे : ३,६२,७२७ १३ मे : ३,४३,१४४ १४ मे : ३,२६,०९८ १५ मे : ३,११,१७० १६ मे : २,८१,३८६ १७ मे : २,६३,५३३ १८ मे : २,६७,३३४ १९ मे : २,७६,०७० २० मे : २,५९,५९१ २१ मे : २,५७,२९९ प्रत्येक दिवशीची मृत्यूसंख्या ४ मे : ३४४९ ५ मे : ३७८० ६ मे : ३९८० ७ मे : ३९१५ ८ मे : ४१८७ ९ मे : ४०९२ १० मे : ३७५४ ११ मे : ४२०५ १२ मे : ४१२० १३ मे : ४००० १४ मे : ३८९० १५ मे : ४०७७ १६ मे : ४१०९ १७ मे : ४३१९ १८ मे : ४५२९ १९ मे : ३८७४ २० मे : ४२०९ २१ मे : ४१९४