अणू उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 23, 2021

अणू उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन

https://ift.tt/3oHGt8n
मुंबई: अणू उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या महिन्यात डॉ. बॅनर्जी यांना करोनाची देखील लागण झाली होती. (former chairman of the dr srikumar banerjee passes away) डॉ. बॅनर्जी २०१० पर्यंत सहा वर्षे भाभा अणू संशोधन केंद्राचे (बार्क) ते संचालकही होते. आयआयटी खरगपूरचे धातू विज्ञान इंजिनीयर असलेले डॉ. बॅनर्जी यांनी बीटेकची पदवी मिळवल्यांनंतर भाभा अणू संशोधन केंद्राशी जोडले गेले होते. ते या संथेच्या संचालकपदापर्यंत पोहोचले होते. डॉ. बॅनर्जी यांचे काम भौतिक धातू आणि धातू विज्ञानावर आधारित होते. त्यांनी आपल्या कारकीर्दित अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांमध्ये सन २००५ मध्ये पद्मश्री आणि सन १९८९ मध्ये मिळालेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचाही समावेश आहे.