नवी दिल्लीः योगगुरू ( ) यांना इंडियान मेडिकल असोसिएशनने (IMA) कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसला पतंजली योगपीठाला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. ने केलेले आरोप पतंजली योगपीठाने ( ) फेटाळून लावले होते. 'अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे' असं योगगुरू रामदेव बाबा हे शनिवारी म्हणाले ( ) होते. सोशल मीडियावर रामदेव बाबांचा यासंदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात रामदेव बाबा अॅलोपॅथीवर टीका करताना दिसत आहेत. आता हरिद्वारमध्ये असलेल्या ट्रस्ट यांनी या प्रकरणी एक स्पष्टीकरण जारी केले आहे. 'रामदेव बाबा हे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अतिशय आदर करतात. करोना संकटाच्या या काळात ते दिवस-रात्र काम करत आहेत. आपल्याला आणि कार्यक्रमात आलेल्या इतरांना व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेला एक मेसेज ते वाचत होते', असं पतंजलीनं स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे. पतंजली योगपीठ ट्रस्टचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ताक्षरात हे स्पष्टाकरण आहे. रामदेव बाबांचे आधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्यांविरोधात कुठलाही चुकीचा हेतू नाहीए. त्यांच्याविरोधात जे काही आरोप करण्यात येत आहेत ते चुकीचे आणि निरर्थक आहेत, असं स्पष्टीकरणात म्हटलं आहे. रामदेव बाबांनी अॅलोपॅथीविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. तसंच अज्ञानातू नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी IMA कडे केली होती.
https://ift.tt/3yzoAgM