करोनाचे थैमान: भारतात आढळलेल्या वेरिएंटचा ५३ देशांमध्ये फैलाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 28, 2021

करोनाचे थैमान: भारतात आढळलेल्या वेरिएंटचा ५३ देशांमध्ये फैलाव

https://ift.tt/3yUnsEG
न्यूयॉर्क: ‘करोनाचा बी.१.६१७ हा प्रकार पहिल्यांदा भारतात आढळला आणि जगभरात ५३ देशांमध्ये सध्या करोनाच्या या वेरिएंटचे रुग्ण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये भारतात २३ टक्क्यांनी घट झाली असून, कोणत्याही देशातील ही सर्वाधिक घट आहे, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून गेल्या आठवड्याभरातील जगभरातील करोनास्थितीबाबतची महत्त्वपूर्ण निरीक्षणे आणि ‘अपडेट’ देण्यात आली. गेल्या आठवड्यात जगभरात करोना रुग्णांची संख्या घटत असून, आठवड्याभरात करोनाचे नवे ४१ लाख रुग्ण आढळले, तर विविध देशांमध्ये ८४ हजार जणांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार रुग्णसंख्येमध्ये १४ टक्के, तर मृत्यूंमध्ये दोन टक्के घट झाली आहे. वाचा: करोनाचा नवा म्युटंट भारतात पहिल्यांदा आढळला. आता हा विषाणू ५३ देशांमध्ये आहे. बी.१.६१७ हा प्रकार ४१ देशांमध्ये आढळला. त्याचप्रमाणे बी.१.६१७.३ हा करोनाचा विषाणू सहा देशांमध्ये आढळला आहे. करोनाचा बी.१.६१७ हा व्हेरियंट चिंतेची बाब असून, यामुळे अनेक देशांना दुसऱ्या लाटेचा जबर फटका बसला आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वाचा: करोनारुग्णांची संख्या घटत असली तरीही विविध देशांमध्ये करोनामृत्यूंची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. दक्षिण पर्व आशियामध्ये करोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मृतांची संख्या चार टक्क्यांनी वाढली आहे. मागील आठवड्यात २० लाख बाधित आढळले असून ३२ हजार करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाचा: मागील एक आठवड्यात जगभरात करोनाचे नवीन ४१ लाख बाधित रुग्ण आढळले. मागील आठवड्यांच्या तुलनेत नवीन बाधितांच्या संख्येत १४ टक्के आणि मृतांच्या संख्येत दोन टक्क्यांनी घट झाली आहे.