नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (२७ मे २०२१) १ लाख ८६ हजार ३६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, १४ एप्रिलनंतर समोर आलेला करोना संक्रमितांचा हा सर्वात कमी आकडा आहे. तसंच, यापूर्वी २४ मे रोजी करोना संक्रमितांचा आकडा दोन लाखांच्या खाली (१ लाख ९६ हजार ४२७) आलेला आढळला होता. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३६६० जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ५९ हजार ४५९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. गुरुवारी देशात सर्वाधिक रुग्णसंख्या तामिळनाडू (३३ हजार ३६१), केरळ (२४ हजार १६६), कर्नाटक (२४ हजार २१४), महाराष्ट्र (२१ हजार २७३) या राज्यांतून समोर आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७५ लाख ५५ हजार ४५७ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या २३ लाख ४३ हजार १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख १८ हजार ८९५ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ७५ लाख ५५ हजार ४५७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ४८ लाख ९३ हजार ४१०
- उपचार सुरू : २३ लाख ४३ हजार १५२
- एकूण मृत्यू : ३ लाख १८ हजार ८९५
- करोना लसीचे डोस दिले गेले : २० कोटी ५७ लाख २० हजार ६६०