दुहेरी संकट! 'तौत्के' धडकण्याआधीच गुजरात भूकंपाचे धक्के - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 17, 2021

दुहेरी संकट! 'तौत्के' धडकण्याआधीच गुजरात भूकंपाचे धक्के

https://ift.tt/3tMNnKA
अहमदाबाद : आज गुजरात दुहेरी संकटाला तोंड देतंय. पुढच्या २४ तासांच्या आत 'तौत्के' चक्रीवादळ गुजरातच्या तटांना जोरदार धडक देण्याची शक्यता आहे. याआधीच गुजरातला जाणवलेत. अमेरली राजुला भागानजिक सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. ३.८ रिश्टर स्केलचे हे धक्के असल्याचं समजतंय. सुदैवानं यात कोणतीही किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. भूकंपशास्त्रातील राष्ट्रीय केंद्रानं (National Center for Seismology) दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३.३३ मिनिटांनी गुजरातच्या राजकोटमध्ये हा भूकंप जाणवला. यामुळे, रात्रीच लोक भीतीनं आपल्या घराच्या बाहेर निघाले. भागात अत्यंत धोकादायक उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी १५ जून २०२० रोजी गुजरातमध्ये २४ तासांच्या आत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. गुजरातचा कच्छ या भागाचा भूकंपाच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक अशा झोन - ५ मध्ये समावेश होतो. या झोनमध्ये ८ रिश्टर स्केनपेक्षाही अधिक तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवू शकतो. तौत्केचाही धोका याच दरम्यान गुजरातला तौत्के चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी गुजरातच्या तटांना धडक देण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामुळे सोमवार आणि मंगळवारी गुजरातमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ अत्यंत भयंकर रुप धारण करू शकतं, असा इशाराही हवामान विभागानं दिलाय. १८ मे रोजी सकाळी चक्रीवादळ तौक्ते पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातच्या तटांना धडक देत पुढे सरकू शकतं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ५० टीम्स तैनात करण्यात आल्या आहे. गुजरातच्या कच्छ भागालाही अलर्टचा इशारा देण्यात आलाय. सोबतच किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. अधिक वाचा :