Maratha reservation: मराठा आरक्षणावर आज निकाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 5, 2021

Maratha reservation: मराठा आरक्षणावर आज निकाल

https://ift.tt/3te6NaY
वृत्तसंस्था, नवी दिल्ली मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज, बुधवारी निर्णय देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१९मध्ये याबाबतचा निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याबाबत निर्णय देणार आहे. या प्रकरणी यापूर्वी दीर्घ सुनावणी झाली असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याबाबत फेरविचार करण्याची विनंतीही यामध्ये झाली होती. १५ मार्च रोजी सुरू झालेल्या या सुनावणीनंतर २६ मार्च रोजी याबाबत न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. केंद्राने घटनात्मकृष्ट्या हे आरक्षण देणे वैध असल्याची भूमिका घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जून २०१९मध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना १६ टक्क्यांना आक्षेप घेतला होता. नोकरीमध्ये १२ टक्क्यांपेक्षा तर प्रवेशात १३ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.