टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय खेळाडूंनी BCCIला केली कळकळीची विनंती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 30, 2021

टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय खेळाडूंनी BCCIला केली कळकळीची विनंती

https://ift.tt/366w3GQ
नवी दिल्ली: पुढील महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसरे सत्र सुरू होईल आणि मग टी-२० वर्ल्डकप होईल. पुढील काही महिन्यात क्रिकेट चाहत्यांचे मोठे मनोरंजन होणार आहे. पण खेळाडूंसाठी मात्र काळजी करणारी गोष्ट समोर आली आहे. वाचा- आयपीएल संपण्यास आणि वर्ल्डकप सुरू होण्यास फक्त दोन दिवसांचे अंतर आहे. आयपीएलची फायनल १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे तर वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. वाचा- यामुळेच बीसीसीआयकडून नियोजित वेळेआधीच आयपीएल स्पर्धे पूर्ण करण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून वर्ल्डकपच्या आधी खेळाडूंना पुरेसा आराम मिळेल. आयपीएल आणि वर्ल्डकप दोन्ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल १० ऑक्टोबर रोजी संपवण्याची योजना तयार करत आहे. वाचा- .. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीसह संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे की खेळाडूंना वर्ल्डकपच्या आधी किमान दोन आठवड्यांचा आराम मिळावा. आयपीएलनंतर भारतीय खेळाडू राष्ट्रीय संघाच्या बायो बबलमध्ये येतील. टी-२० वर्ल्डकपच्या क्वालीफायल लढती १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. तर मुख्य लढती २४ ऑक्टोबरपासून सुरू होतील. वाचा- भारतीय खेळाडूंचा कार्यक्रम व्यस्त आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहेत. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दुसरा संघ श्रीलंकेत मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका झाल्यानंतर खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागतील. अशात खेळाडूंना वर्ल्डकपच्या आधी विश्रांती मिळणार नाही.