'आसियान'च्या बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला कडक इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 17, 2021

'आसियान'च्या बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला कडक इशारा

https://ift.tt/35vNrF0
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पार करण्यासाठी हिंद-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) क्षेत्रात नवी नियम आधारित व्यवस्था निर्माण व्हायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी बुधवारी केले. सोबतच, व मूलतत्त्ववाद हे जागतिक शांतता व सुरक्षेपुढील सर्वांत मोठे अडथळे असून दहशतवादी संघटना व त्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. दहशतवादाला प्रोत्साहन, पाठिंबा व अर्थसाह्य देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला. 'आसियान'ची बैठक 'आसियान'च्या () संरक्षणमंत्र्यांदरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या एडीएमएम प्लस या बैठकीत ते बोलत होते. चीनच्या दक्षिण समुद्रासह या सागरी क्षेत्रात नौवहन, सागरी क्षेत्रातील विमान उड्डाण व अडथळ्यांविना असणारे आंतरराष्ट्रीय व्यापारी जलमार्ग सर्वांसाठी खुले असावेत, असेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत सागरी क्षेत्रातील सुरक्षा हादेखील भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या क्षेत्रात सर्वांसाठी नौवहन, विमान उड्डाण व आंतरराष्ट्रीय व्यापार खुले असावे असे आम्हाला वाटते. परंतु चीनच्या दक्षिणेकडच्या सागरी क्षेत्रात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. चीनने या क्षेत्रात आक्रमक पवित्रा घेतला असून त्यामुळे या भागाकडे सर्वांचे लक्ष आहे. या क्षेत्रात निर्माण झालेली नवी आव्हाने ही जुनाट पद्धतींद्वारे मोडून काढता येणार नाहीत. त्यासाठी विशिष्ट नियम, आचारसंहिता निर्माण करावी लागेल, असेही राजनाथ यांनी नमूद केले. आसियानमध्ये भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझिलंड, रिपब्लिक ऑफ कोरिया, रशिया व अमेरिका आदी देशांचा सहभाग आहे.