नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (१० जून २०२१) ९१ हजार ७०२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे, भारतात सलग चौथ्या दिवशी एक लाखांहून कमी आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ३४०३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा ठरलाय. बुधवारच्या दिवसात १ लाख ३४ हजार ५८० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ७७ लाख ९० हजार ०७३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ११ लाख २१ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ६३ हजार ०७९ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ७७ लाख ९० हजार ०७३
- उपचार सुरू : ११ लाख २१ हजार ६७१
- : ३ लाख ६३ हजार ०७९
- करोना लसीचे डोस दिले गेले : २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९