Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरूवात, या तारेखपर्यंत पाऊस कोसळणार, थेट.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 22, 2026

Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरूवात, या तारेखपर्यंत पाऊस कोसळणार, थेट..

Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरूवात, या तारेखपर्यंत पाऊस कोसळणार, थेट..

यंदा राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल होण्यास उशीर झाला. अरबी समुद्रातच मॉन्सून रेंगाळताना दिसला. आज राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. विशेष म्हणजे पहाटेपासूनच अनेक भागात पासून कोसळत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट लोक पाहत होते. अखेर आज पाऊस सुरू आहे. पाऊस येत नसल्याने राज्यभरात पेरण्या रखडल्या होत्या. अखेर आज पावसाला सुरूवात झाली. काही भागात भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्टही जारी करण्यात आला. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण असल्याने जोरदार पाऊस आज कोसळू शकतो.

राज्याभरात दमदार पावसाला अखेर सुरूवात 

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. मुंबई, ठाणे. रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, भंडारा, गोदिंया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर या भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. पुढील 8 दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे.

अनेक जिल्ह्यात पावसाचा मोठा अलर्ट 

पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल होत नव्हता. पाऊस अरबी समुद्रातच रेंगाळत होता. त्यामध्येच एल निनोही सक्रिय झाला होता. अखेर आज राज्यभरात पावसाला पोषक वातावरण आहे. मुंबईमध्ये थंडगार वातावरण या पावसाने निर्माण झाले. पाऊस येत नसल्याने शेतकरी राजाही तणावात होता. अखेर पावसाला सुरूवात झाली.

पहाटेपासूनच दमदार पावसाला सुरूवात 

दादरमध्ये पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. मुंबईत आज सकाळपासूनच हवामानात अचानक बदल झाला असून, दादर आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणात पावसाला सुरुवात झाली आहे. या पहिल्यावहिल्या दमदार सरींमुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.