नवी दिल्ली : 'लोकजनशक्ती पक्षात संघर्ष सुरू असताना भाजपचे मौन वेदनादायक आहे,' असे लोकजनशक्ती पक्षाचे नेते यांनी मंगळवारी सांगितले. 'भाजपशी असलेले संबंध एकतर्फी राहणार नाहीत, तसेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू राहिल्यास राजकीय भवितव्याबाबत मी सर्व शक्यतांचा विचार करीन,' असेही चिराग यांनी सांगितले. 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवान म्हणाले, 'माझे वडील रामविलास पासवान आणि मी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसोपबत कायम उभे राहिलो; मात्र, कठीण काळात हस्तक्षेपाची अपेक्षा असताना माझ्यासोबत उभा राहिला नाही. आपल्याबरोबर कोण उभे आणि कोण नाही याच्या आधारावर राजकीय भवितव्याचा निर्णय घेईल.' लोक जनशक्ती पक्षात '' फूट पाडत असताना भाजपने गप्प राहणे योग्य नसल्याचेही चिराग पासवान यांनी म्हटले आहे. भाजपने हस्तक्षेप करावा अशी माझी अपक्षा होती. मात्र, त्यांचे मौन निश्चितच वेदनादायी आहे, असेही पासवान म्हणाले. लोक जनशक्ती पक्षातील घडामोडी हा त्यांच्या अंतर्गत मुद्दा असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री यांच्या 'जेडीयू'ने माझ्या पक्षात फूट पाडण्यासाठी भूमिका बजावल्याचा आरोपही चिराग पासवान यांनी केला.