रियाध: जम्मूतील सतवारी हवाई तळावर रविवारी पहाटे ड्रोनद्वारे दोन स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा आता अधिकच सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी क्वॉडकॉपर ड्रोन्सद्वारे हवाई तळावर हल्ले केले असल्याचे म्हटले जात आहे. हवाई तळावर अशा प्रकारचे हल्ले करण्याची पद्धत येमेनमधील हुती बंडखोरांकडूनही वापरली जाते. हुती बंडखोरांचे ड्रोन काही किलोमीटर अंतर कापून सौदी अरेबियाच्या हवाई तळावर हल्ले करतात. जम्मूतील हवाई हल्ल्यात वापरण्यात आलेले ड्रोन सीमेपलिकडून आले होते की स्थानिक दहशतवाद्यांनी वापरले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हुती बंडखोरांचा हल्ल्याचा पॅटर्न येमेनमध्ये सक्रिय असलेल्या हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या हवाई तळावर हल्ले करण्यात येतात. या बंडखोरांना इराणकडूनही मदत दिली जात असल्याचे म्हटले जाते. हुती बंडखोरांना शस्त्रे, ड्रोन आणि इतर स्फोटके इराणी सैन्याकडून दिले जातात. त्यांच्याकडे चिनी बनावटीचे ड्रोनदेखील आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून जवळच्या लक्ष्यावर हल्ला केला जातो. वाचा: 'द नॅशनल'च्या वृत्तानुसार, हुती बंडखोरांनी स्वत:ची ड्रोन इंडस्ट्री स्थापन केली आहे. सीमेपलिकडून आणि इराणकडून ड्रोन बनवण्यासाठी त्यांना साहित्य पुरवले जाते. इराणकडून अभियंते आणि तांत्रिक मदत ही पुरवली जाते. त्यामुळे सामान्य वाटणारे ड्रोन घातक शस्त्रांमध्ये बदलत आहेत. मागील वर्षात २६७ ड्रोन हल्ले चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने हुती मिलिशियाचे लष्करी प्रवक्ते याहया सरायाच्या हवाल्याने सांगितले की, २०२० मध्ये ,सौदी अरेबियन सैन्याच्या ठिकाणांवर २६७ ड्रोन हल्ले करण्यात आले. येमेनमध्येच १८० हल्ले ड्रोन हल्ले झाले होते. सौदी अरेबियाच्या नेतृत्वात काही देशांचे सैन्य हुती बंडखोरांविरोधात लढत आहेत. वाचा: वाचा: वर्ष २०२१ मध्ये ही हुती बंडखोरांचे ड्रोन हल्ले सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात हुती बंडखोरांनी दक्षिण-पश्चिम सौदी अरेबियाच्या अबहा आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात एका प्रवासी विमानाला आग लागली. त्याच वेळेस सौदी लष्कराने कारवाई करत दोन ड्रोन हवेतच पाडले.