इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 23, 2021

इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

https://ift.tt/2SQMAfo
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी सुरु केलेली इंधन दरवाढ अद्याप थांबलेली नाही. मागीत दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल २९ वेळा दरवाढ केली आहे. ज्यामुळे अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी गाठली तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आज बुधवारी कंपन्यांनी स्थिर ठेवले. कंपन्याकडून एक दिवसआड दरवाढ केली जात आहे. रविवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात २९ पैसे वाढ केली होती तर डिझेलमध्ये २८ पैशांची वृद्धी केली होती. त्यानंतर सोमवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर काल मंगळवारी पेट्रोल २८ पैशानं आणि डिझेल २६ पैशांनी महागले होते. आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.६३ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९७.५० रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.६५ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९७.३८ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. मुंबईत डिझेलचा आजचा भाव ९५.७२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८८.२३ रुपये आहे. चेन्नईत ९२.८३ रुपये आणि कोलकात्यात ९१.०८ रुपये आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९६.९३ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. जागतिक कमाॅडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे किंमतींवर दबाव निर्माण झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या आकडेवारीनुसार १८ जूनअखेरच्या आठवड्यात ७.१९९ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. काल मंगळवारी कच्च्या तेलाचा भाव ०.११ डाॅलरने वधारला आणि ७४.८१ डाॅलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये डब्लूटीआय क्रू़डचा भाव ०.४६ डाॅलरने वधारला आणि ७३.६६ डाॅलर प्रती बॅरल झाला.