...तर महापौर आमचा बाप काढतील; आशीष शेलार यांचा टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 15, 2021

...तर महापौर आमचा बाप काढतील; आशीष शेलार यांचा टोला

https://ift.tt/35oGWU4
मुंबई: महालक्ष्मी येथील भागातील शौचालयाच्या मालकीहक्कावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते यांनी शिवसेना आणि मुंबईच्या यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना हा पक्ष अभिनिवेश आणि अहंकार या दोन दुर्गुणांनी भरला आहे. शौचालय उघडायचे नाही आणि स्थानिकांना डावलायचे असे राजकारण सुरू आहे. दुसऱ्याबाजूला महापौरांना काही बोलायलाही भिती वाटते, बोललो तर त्या आमचा बाप काढतील, अशी टिप्पणी शेलार यांनी केली आहे. (bjp leader ashish shelar criticizes and mayor of mumbai kishori pednekar) धोबीघाट भागातील शौचालयाच्या मुद्यावर भाजप आणि मनसे एकत्र आले आहेत. त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेवर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. या शौचालयाचे उद्घाटन महापौर पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी १२ जून रोजी केले होते. हे शौचालय चालवण्याची जबाबदारी धोबी कल्याण वेल्फेअर सोसायटीकडे देण्यात आले होते. भाजप नेते आशीष शेलार यांनी आज या शौचालयाला भेट देत पाहणी केली. क्लिक करा आणि वाचा- धोबी घाटातील हे सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेकडे होते. मात्र नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून ते काढून घेण्यात आले. ही संस्था अल्प दरात ही सुविधा देत होती. असे असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देत आहेत. याबाबत स्थानिकांमध्ये रोष आहे असे आशीष शेलार यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-