मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशभरात पेट्रोल आणि दर स्थिर आहेत. यापूर्वी मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती. काल पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल २८ पैशांनी महागले होते तर सोमवारी इंधन दर स्थिर होते. आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०४.९० रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.८१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९९.८० रुपये इतका भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९८.६४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०७.०७ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.७२ रुपये आहे.दिल्लीत डिझेल ८९.१८ रुपये आहे. चेन्नईत ९३.७२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.०३ रुपये प्रती लीटर आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.९३ रुपये झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. गेल्या आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७६ डॉलरवर गेला होता.काल मंगळवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.१० डॉलरने कमी झाला आणि तो ७४.६८ डॉलरवर स्थिरावला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२१ डॉलरने वधारला आणि तो ७२.९८ डॉलर प्रती बॅरलपर्यंत वाढला.