
नवी दिल्लीः कॅनडा, मॅक्सिको, नायजेरिया आणि पनामासह जवळपास ५० देशांनी आपल्याकडील लसीकरण मोहीमेसाठी प्लॅफॉर्ममध्ये ( ) रुची दाखवली आहे. भारत 'ओपन सोर्स सॉफ्टवेअर' मोफत देण्यास तयार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. कोविन सॉफ्टवेअरची एक 'ओपन सोर्स' आवृत्ती विकसित करण्यासाठी आणि यात रुची दाखवणाऱ्या कुठल्याही देशाला ते मोफत उपलब्ध करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचे करोनावरील लसीकरण ( ) मोहीमेतील डॉ. आर. शर्मा यांनी दिली. कोविन प्लॅटफॉर्म जगभरात लोकप्रिय झाला आहे. मध्य आशिया, लॅटीन अमेरिका, आफ्रिका येथील जवळपास ५० देशांनी कोविनमध्ये आपली रुची दाखवली आहे, असं शर्मा म्हणाले. औद्योगिक संघटना सीआयआयने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जगभारातील आरोग्य आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांचं एक जागतिक संमेलन ५ जुलैला डिजिटल पद्धतीने आयोजित केलं जाईल. त्यात भारताकडून कोविन प्रणाली कशी काम करते? याची माहिती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. कॅनडा, मॅक्सिको, पनामा, पेरू, अजरबैजान, युक्रेन, नायजेरिया, युगांडा अशा अनेक देशांनी कोविनमध्ये रुची दाखवली आहे. व्हीएतनाम, इराक, डोमिनिका, संयुक्त अरब अमीराती (यूएई) सारख्या देशांनी आपल्याकडील लसीकरण मोहीमेसाठी कोविनमध्ये रुची दाखवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या ५ महिन्यात ३० कोटींहून अधिक नागरिकांची नोंदणी आणि लसीकरणासाठी सक्षम ठरले आहे. हे एक नागरिक केंद्रीत व्यासपीठ आहे आणि जिल्हा पातळीवर त्याचे स्रोत प्रदान करते. सुरवातीपासूनच या प्लॅटफॉर्मचा वापर नियोजन करण्यासाठी केला जाऊ शकेल, हे सुरवातीपासूनच निश्चित करण्यात आले होते, असं शर्मांनी सांगितलं.