करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 28, 2021

करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य

https://ift.tt/3xe39k0
तेल अविव: मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि बाधितांची संख्या वाढू लागल्याने मास्क वापराचे निर्बंध शिथिल करणाऱ्या इस्रायलने पुन्हा एकदा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. मागील काही दिवसांपासून इस्रायलमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्त्रायली आरोग्य मंत्रालयाने बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सांगितले आहे. जवळपास १०-१२ दिवसांपूर्वीच हा निर्णय मागे घेण्यात आला होता. इस्रायलमध्ये डेल्टा वेरिएंटचा फैलाव होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये इस्रायलमध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. येत्या काही दिवसात करोनाबाधित आढळण्याचा दर दुप्पट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. करोना डेल्टा वेरिएंटमुळे संसर्ग वाढत असल्याची शक्यता इस्रायलच्या महासाथ आजार टास्क फोर्सचे प्रमुख नॅचम अॅश यांनी व्यक्त केली. वाचा: वाचा: करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि करोना बळींची संख्या फारशी वाढली नसल्याचे त्यांनी म्हटले. करोना लशीमुळे बचाव होत असून गंभीर आजारी झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी राहिल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचा: दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर नागरिकांना इशारा दिला होता. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे इस्रायलमध्ये डेल्टा वेरिएंट फैलावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कठोरपणे चाचणी केली जाणार आहे. इस्रायलच्या नागरिकांनीही परदेशवारी कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान बेनेट यांनी केले.