मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच, योगींच्या मंत्र्याचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 22, 2021

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच, योगींच्या मंत्र्याचा दावा

https://ift.tt/3gJIVJe
लखनऊ : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल, असा दावा उत्तर प्रदेश सरकारच्या एका मंत्र्यानं केला आहे. '२०२२ सालीही भाजपच निवडणूक जिंकणार. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडून ज्याची मुख्यमंत्रीपदी नेमणूक होईल, आम्ही त्याचं स्वागत करू' असंही भाजप नेते यांनी म्हटलंय. 'आगामी निवडणूक मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, यावर फेरविचार करण्याची गरज नाही' या पक्षाच्या अधिकृत वक्तव्याशी मंत्र्यांचं वक्तव्य विसंगत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये आहेत तसंच सध्या ते कामगार मंत्रालयाची जबाबदारी हाताळत आहे. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीतून भाजप नेते आणि लखनऊत दाखल झालेले आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांशी ते संवाद साधत आहेत. पक्षाच्या नेत्यांची दुसऱ्या टप्प्यातील बैठक मंगळवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मौर्य यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्यात येणार असल्याच्या अफवांदरम्यान बी एस संतोष आणि राधा मोहन सिंह या दोन्ही नेत्यांनी दोन आठवड्यांपूर्वीही लखनऊचा दौरा केला होता. उल्लेखनीय म्हणजे, २०१७ साली भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी कोणतंही नाव जाहीर न करता निवडणूक लढली होती. भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती केली जाईल, याची अपेक्षा अनेकांना नव्हती.