जलसमाधी मिळालेल्या त्या कारची अखेर सुटका; १२ तासांनंतर बाहेर काढण्यात यश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 14, 2021

जलसमाधी मिळालेल्या त्या कारची अखेर सुटका; १२ तासांनंतर बाहेर काढण्यात यश

https://ift.tt/3pMKM31
मुंबईः इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली कार तिथेच बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विहिरीत बुडालेल्या या कारला अखेर १२ तासांनी बाहेर काढण्यात यश आलं आहे. रविवारी सकाळी ही कार विहिरीत बुडाली होती. घाटकोपर येथील एका इमारतीतील पार्किंगमध्ये खड्डा तयार होऊन त्यात चक्क कार बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करुन ती विहीर झाकण्यात आली होती. त्या आरसीसी केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी कार पार्क करत होते. सोशल मीडियावर कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंपाच्या सहाय्याने विहिरीतल पाण्याचा उपसा करण्यात आला होता. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही. वाचा: कार खड्ड्यात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका करण्यात आली होती. यावर मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन खात्याकडून अधिक माहिती देण्यात आली आहे व या घटनेशी महापालिकेचा कोणताही संबंध नसून ही एका खासगी सोसायटीतील घटना असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेचा संबंध मुंबई महापालिकेच्या नालेसफाईशी जोडत निशाणा साधला होता. हीच का मुंबई महापालिकेची नालेसफाई?, असा सवाल या निमित्ताने सोमय्या यांनी केला होता.