टीआरपीसाठी गोस्वामींचे दासगुप्तासोबत संगनमत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 24, 2021

टीआरपीसाठी गोस्वामींचे दासगुप्तासोबत संगनमत

https://ift.tt/3zUSE72
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'रिपब्लिक टीव्हीचे टीआरपी कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक यांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत संगनमत केले', असा आरोप मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर विभागाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी तिसरे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यातील अधिक तपशील बुधवारी समोर आला. 'गोस्वामींच्या वृत्तवाहिन्यांना लाभ मिळावा, या हेतूने दासगुप्ता यांनी बार्कमधील गोपनीय माहिती अनेकदा गोस्वामींना दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवून फायदा मिळवून देण्याच्या बदल्यात गोस्वामींनी दासगुप्ताला मोबदला दिला. दासगुप्ताच्या घरातून महागडे दागिने व अन्य मौल्यवान वस्तू जप्त केल्यानंतर याविषयीचे पुरावे समोर आले', असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. दासगुप्ता सध्या जामिनावर आहे. जून-२०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत दासगुप्ता हा बार्कमध्ये कार्यरत होता. त्या काळात पहिल्या क्रमांकावर असलेल्या 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीच्या टीआरपीमध्ये कृत्रिमरीत्या फेरफार करण्यात आला, जेणेकरून रिपब्लिकच्या वृत्तवाहिन्यांचे टीआरपी अधिक राहून त्याचा फायदा त्या वाहिन्यांना मिळावा. गोस्वामींच्या संगनमताने दासगुप्ताने केलेल्या या घोटाळ्यामुळे 'टाइम्स नाऊ'ला ४३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.