मुंबईः ऑनलाइन क्लास सुरू असताना पॉर्न व्हिडिओ चालू केला अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 28, 2021

मुंबईः ऑनलाइन क्लास सुरू असताना पॉर्न व्हिडिओ चालू केला अन्...

https://ift.tt/35SBPMq
मुंबईः करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये ऑनलाइन माध्यमातून सुरू आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचे काही तोटेही समोर येत आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाचा ऑनलाइन क्लास सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. () विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात ऑनलाइन वर्ग सुरु होता. या दरम्यान काही टवाळखोरांनी चालु वर्गात अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. वर्ग सुरू असतानाच पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यानं एकच खळबळ उडाली. मागील आठवड्यात ही घटना घडली असून संबंधित प्राध्यपकांनी याची गंभीर दखल घेत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वाचाः ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात आयपीसी २९२, ५७० आणि सायबर गुन्हेअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, करोना संकटामुळं गेले दीड वर्ष शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळं विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरु असताना अनेक अशा घटना समोर येत आहेत. याआधीही वेगवेगळ्या शहरातून अशा घटना समोर आल्या होत्या. काही ठिकाणी तर शिक्षकांची टिंगल करणं व अपशब्द वापरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. वाचाः