पंजाब नॅशनल बँक घोटाळा : मेहुल चोक्सीला तात्पुरता दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 29, 2021

पंजाब नॅशनल बँक घोटाळा : मेहुल चोक्सीला तात्पुरता दिलासा

https://ift.tt/3y1qdme
मुंबई : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी याला परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत (एफईओ) परागंदा घोषित करण्याविषयीच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील निर्णय जाहीर करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाला तात्पुरती केलेली मनाई मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आणखी तीन आठवड्यांसाठी कायम ठेवली. शंभर कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक घोटाळ्यातील देशाबाहेर पसार झालेला आरोपी त्याच्याविरोधात वॉरंट जारी केल्यानंतरही खटल्याला सामोरे जात नसल्यास त्याला न्यायालय एफईओ कायद्यांतर्गत परागंदा घोषित करते. त्यानंतर त्याच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया ईडीला न्यायालयाच्या परवानगीने सुरू करता येते. यापूर्वी याच घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी व बँक कर्ज घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती विजय मल्ल्या यांना न्यायालयाने परागंदा घोषित केलेले आहे. चोक्सीलाही परागंदा घोषित करण्यासाठी ईडीने पीएमएलए न्यायालयात २०१९मध्ये अर्ज केला होता. मात्र, चोक्सीने अॅड. विजय अगरवाल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दोन अर्ज करून त्याला आव्हान दिले होते.